Wednesday, 9 November 2011

नाही शोधल्या खाणा-खुणा
तरी वाट चालून आली..
रात्रीच्या चांदण्यांना 
मध्यानी जागवून गेली...

चार शब्द बांधले मी 
मनीचे गूज सांगायला..
तुझ्या एका हाकेत 
कविता बहरून आली..

Saturday, 22 October 2011

तुला काही कळत नाही...

तुला काही कळत नाही
चांदण्यात विखुरलेली नक्षत्रांची 
कोडी काही सुटत नाहीत 

रात्रीचा प्रहर उलटून गेला तर
चांदण्यांची साथ पण सुटून जाईल,
परतीच्या वाटेवर 
सावली पण विरत जाईल...

Tuesday, 27 September 2011

चांदण्यांच्या कोड्यात....


वाळूत कोरलेली वाट
अथांग निळाई पर्यंत गेली,
पाऊले चालत राहिली 
पण वाट विरघळून गेली



परतीची वाट तर
लाटांनी पुसून टाकली,
भरकटलेल्या पावलांना
त्या क्षितिजाची आस लागली
चांदण्यांच्या कोड्यात.....

काठावरून ओढणारी निळाई 
बघता बघता गेहरी होत गेली,
पाऊले थबकली पण 
नजर अजूनही क्षितिजाचा वेध होती..

त्या गर्द निळाईत आता 
चांदण्यांची भर पडली,
सूर्यास्त होता होता 
नवी स्वप्ने जागवून गेली...

चांदण्यांच्या कोड्यात 
नवा स्वप्नांची आशा होती,
क्षणभर डगमगलेल्या त्या 
पावलांना आता नव्या 
क्षितिजाची आस होती..

​चांदण्यांच्या कोड्यात 
नक्षत्राची वाट सापडली,
भरकटलेल्या पावलांना 
एक नवी साथ मिळाली..

पाहत फुटता फुटता 
वळुन पहिला तर 
किनाऱ्यावर स्वप्नांचा गाव होतं...
त्या गेह्ऱ्या निळाईत रात्रीच्या 
चांदण्यांचा प्रतिबिंब होतं......

 

Tuesday, 19 July 2011

चारोळ्या....

तुला पाहिले की मला चंद्राची आठवण येते,
कलेकलेनी वाढतच जाणारे माझे प्रेम..
अन कलेकलेनी घटत जाणारा तुझा सहवास,
अमावस्येची भीती अन पौर्णिमेची आस..
शापित तरी भुरळ पाडणारी तुझी निरव साथ.... 



पूर्णविराम देऊन खूप काळ खूप काळ सरला
पण मन वेड अजूनही
ती अर्धी कविता अन अश्रुंनी
डागाळलेल्या पानावरच रेंगाळलय....
जे सांगायचं होतं बोलायचा होतं
ते तर त्याच्याकडेच राहून गेला
त्या पुर्णाविरामच ओझं त्याला
आत्ता कुठे उमगायला लागलंय.....

Saturday, 16 July 2011

कोऱ्या पानांचा अर्थ.......?



पापाण्यांवरून जेव्हा
आसवांचे ओझे सरकते 
दुःख माझे तेव्हा हळूच
या पानांवर उतरते

बोलावेसे वाटातानाही,
शब्दांशी वैर होते 
लपवते ते पान मला पदरात 
जेव्हा जवळचे गैर होते...


स्पर्शतात अश्रू ओठांना 
जेव्हा जगाचा स्वार्थ कळतो
हसताना शब्द मग माझे अश्रुतही
जेव्हा कोऱ्या पानांचा अर्थ त्यांना कळतो....

Wednesday, 13 July 2011

वाळुत रेखाटल्या चार ओळी नवीन सुरुवात सुचवून गेल्या...
किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटा परतीची ओढ लावून गेल्या...
वाळूच्या घरात उभा राहिलेला ते जग किती सुंदर होता
पळभरासाठी असला तरी माझ्या जिवाभावाचा होता.....
पण तो समोरचा समुद्र पण किती समंजस 
शांतपणे पुसून टाकली त्यांनी ती पळभराची फसवणूक 
नवीन सुरवातीसाठी पाटी कोरी करून .......
-तेजश्री 

Tuesday, 12 July 2011

चार ओळी.....


तुझ्याच चार ओळी 
तुझी आठवण काढुन गेल्या.....
मध्यानीच्या उन्हाला 
चांदण्यांचे 
ग्रहण लावून गेल्या.....


रोज नवे द्वंद आता कही संपत नाही
हरवण्यासारखे हातात काही उरले नाही..
उरला तो खेळ आठवणींचा आता
नव्या प्रकाशाला वाट नाही........


स्वप्नांच्या तुकड्यातला एक
तो "आठवण" म्हणून घेऊन गेला...
उरलेले सगळे हातात राहून गेले
सगळी कोडी अनुत्तरीत ठेवून....


नव्याने केलेली शेवटची सुरुवात
एक नवीन दिशा दाखवून गेली..
शेवट काही का असेना 
सुरुवात क्षणभर सुखावुन गेली....
-तेजश्री