Tuesday, 27 September 2011

चांदण्यांच्या कोड्यात....


वाळूत कोरलेली वाट
अथांग निळाई पर्यंत गेली,
पाऊले चालत राहिली 
पण वाट विरघळून गेली



परतीची वाट तर
लाटांनी पुसून टाकली,
भरकटलेल्या पावलांना
त्या क्षितिजाची आस लागली
चांदण्यांच्या कोड्यात.....

काठावरून ओढणारी निळाई 
बघता बघता गेहरी होत गेली,
पाऊले थबकली पण 
नजर अजूनही क्षितिजाचा वेध होती..

त्या गर्द निळाईत आता 
चांदण्यांची भर पडली,
सूर्यास्त होता होता 
नवी स्वप्ने जागवून गेली...

चांदण्यांच्या कोड्यात 
नवा स्वप्नांची आशा होती,
क्षणभर डगमगलेल्या त्या 
पावलांना आता नव्या 
क्षितिजाची आस होती..

​चांदण्यांच्या कोड्यात 
नक्षत्राची वाट सापडली,
भरकटलेल्या पावलांना 
एक नवी साथ मिळाली..

पाहत फुटता फुटता 
वळुन पहिला तर 
किनाऱ्यावर स्वप्नांचा गाव होतं...
त्या गेह्ऱ्या निळाईत रात्रीच्या 
चांदण्यांचा प्रतिबिंब होतं......